नवी दिल्ली – देशातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आता पुन्हा चाळीस हजारांच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 39 हजार 70 नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोविडग्रस्तांची संख्या आता 4 कोटी 27 लाख 822 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासांत कोविडमुळे एकूण 491 रुग्ण दगावले आहेत. देशातील सध्याच्या सक्रिय बाधितांची संख्या आता 4 लाख 6 हजार 822 इतकी झाली आहे. देशातील लसीकरणाचे कामही धिम्यागतीने सुरू असून आत्ता पर्यंत 50 कोटी 68 लाख जणांना कोविड लसींचा किमान एक डोस देण्यात आला आहे.
देशात 4 मे ते 23 जून या अवधीत तब्बल 1 कोटी लोकांना करोनाची लागण झाली होती. त्या तुलनेत करोनाची लागण होण्याचे प्रमाण आता बऱ्यापैकी नियंत्रणात आले असले तरी अजून देशात सरासरी चाळीस हजार रुग्ण सापडत असल्याने करोनाची दुसरी लाट अजून पूर्ण आटोक्यात आली नसल्याचे चित्र आहे.