लंडन – ब्रिटनने भारतातील विमान प्रवासाबाबतच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. ब्रिटनने त्या बाबतीत भारताला रेड यादीतून अंबर यादीत टाकले आहे. भारतातील ज्या रूग्णांचे पुर्ण लसीकरण झाले आहे, त्यांना आता ब्रिटनमध्ये प्रवेश केल्यानंतरची दहा दिवसांची हॉटेल क्वारंटाईनची अट काढून टाकण्यात आली आहे.
त्याऐवजी ते जेथे उतरणार आहेत त्यांना तेथेच होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. ज्यांचे ब्रिटन किंवा युरोपात लसीकरण झाले आहे त्यांना होम क्वारंटाईन मधून सुट देण्यात आली आहे. भारतात ज्या रूग्णांनी सीरम संस्थेची कोविशिल्ड लस घेतली आहे, त्या प्रवाशांना ब्रिटन प्रमाणे पुर्ण सवलत देण्याच्या संबंधात अजून निर्णय झालेला नाही, पण त्याचा विचार सध्या ब्रिटन मध्ये सरकारी पातळीवर सुरू ओ असे संबंधीत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.