पुणे – शहरात थंडीचा जोर कमी झाला असून, पुढील तीन दिवस थंडी कमी असेल. तर किमान तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याने थंडी अजून कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून राज्यातील किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येते. उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्रापर्यंत पोहचत नसल्यामुळे किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. पर्यायाने पुणे शहरात 13 डिसेंबरपर्यंत आकाश निरभ्र आणि सकाळी हलके धुके पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारी (दि. 11) शहरात किमान तापमान 15.8 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तर कमाल तापमानही 30 अंशाच्या पुढे आहे.
मागील 24 तासातील काही प्रमुख भागातील किमान तापमान
पाषाण 14, एनडीए आणि हवेली 14.6, शिवाजीनगर, बारामती आणि तळेगाव 15.8, लवासा, इंदापूर 16, हडपसर 16.7, पुरंदर 17, खेड 18.5, लोणावळा 19.6, मगरपट्टा 20.4, वडगावशेरी 21.2