शिक्रापूर – आपटी (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्त्या दिपिका भालेराव यांनी यापूर्वी अनेक समाजपयोगी कामे मार्गी लावले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत दिपिका भालेराव यांची नुकतीच कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिपिका भालेराव यांना निवडीचे पत्र दिले आहे.
यावेळी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे जिल्हा संघटक निलेश गायकवाड, दिक्षांत भालेराव, भूषण गायकवाड, रुचिका वासवानी, साधना काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना राज्याला प्रेरणा देणारा कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ आहे. विजय रणस्तंभ परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.