मुंबई – सध्या रणबीर कपूर त्याचा शेवटचा चित्रपट ‘तू झुठी, मैं मक्कर’च्या यशाचा आनंद घेत आहे. त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. सध्या तो आपल्या आगामी ऍनिमल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच रणबीरला एका लाजिरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रणबीर कपूरने नुकतंच एका बुक लॉन्च इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत त्यांची आई नीतू कपूरही उपस्थित होती. यादरम्यान रणबीरने वडील ऋषी कपूर यांच्या आठवणीतल्या अनेक गोष्टी शेअर केल्या, पण यादरम्यान त्याच्याकडून असं काही कृत्य घडलं कि ज्यामुळे काय करावे हे देखील त्याला सुचेना. मात्र या प्रसंगाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
कार्यक्रमात बोलत असताना रणबीर कपूर पूर्णपणे विसरला की त्याच्या हातात गरम कॉफी कप आहे.एका हातात कप आणि दुसऱ्या हातात माईक अशा रणबीरच्या गप्पा सुरु होत्या. अशात माईक थेट कॉफी असलेल्या कपला लागला आणि कॉफी थेट पॅण्टवर सांडली. यानंतर नेमकं काय करावं हे रणबीरला सुचेना तो काही काळ उठून उभा देखील राहिला. बरं कॉफी अशा ठिकाणी सांडली कि पुन्हा बसणं देखील कठीण होत. अर्धी पॅण्टवर तर अर्धी बसण्याच्या चेअरवर सांडलेली कॉफी पाहून चाहत्यांना देखील हसू आलं.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. ‘तरी बरं लग्न झालं आहे’ अशी कमेंट एका चाहत्याने केली तर एकाने ती काही कॉफी ठेवण्याची जागा आहे का ? असा प्रश्न विचारला. अनेकांनी यावर कप कसा पकडायचा याबाबत रणबीरला सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
रणबीर कपूरच्या करिअरसाठी 2022 आणि 2023 ही दोन्ही वर्षं खूप चांगली होती. त्याच्या ‘तू झुठी, मैं मक्कर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. श्रद्धा कपूर-रणबीर कपूर स्टारर या चित्रपटाने 225 कोटी आणि भारतात सुमारे 146 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर चाहते आता त्याच्या ऍनिमल चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.