नगर, (प्रतिनिधी) – महापालिकेकडून मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी आक्रमक कारवाई सुरू आहे. तीन दिवसात ५८ मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन तोडून पाणी बंद करण्यात आले आहे. सात मालमत्तांवर जप्ती कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मोहिमेमुळे थकबाकीदारांची धावपळ उडाली असून, दिवसात दिवसात सुमारे २९लाखांचा कर जमा झाला आहे.
वर्षभरात महापालिकेची अवघी ४५.८४ कोटींची कर वसुली झाली आहे. २०४.६६ कोटींची थकबाकी अद्यापही बाकी आहे. वारंवार शास्ती माफीची योजना राबवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. दोन दिवसांपासून कारवाईला गती मिळाली आहे. चारही प्रभाग अधिकाऱ्यांकडून थकबाकीदारांना नोटीसा व जप्ती वॉरंट बजावल्याचे उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी सांगितले.