सातारा -टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला महाराष्ट्राचा उदयोन्मुख तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून घरात घुसून सामानाची फेकाफेक करत त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा संतापजनक प्रकार सातारा जिल्हतील सरडे गावात घडला.
धास्तावलेल्या कुटुंबियांकडून प्रवीणला माहिती दिल्यानंतर त्याने माध्यमांना दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून मोलमजुरी करून मुलाला घडवणाऱ्या जाधव कुटुंबियांना दिलासा देण्याची मागणी क्रीडा क्षेत्रातून होत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात अपयश आल्यावरही त्याने स्वतःचाच विक्रम मोडून नवा विक्रम साकार केला होता. यानंतरच ही घटना घडल्याचे त्याने सांगितले.
त्याच्या घराची दुरुस्ती करू नये, यासाठी त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. जपानवरून मायदेशी परतल्यावर प्रविण हरीयाणात होत असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेसाठी शिबिरात सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी घडलेली घटना त्याला सांगितल्यावर त्याने याबाबत माध्यमांशी संवात साधला आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. प्रविणच्या घरात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने घूसून आकांडतांडव केले, सामानाची आदळआपट केली व घर दुरुस्ती करु नये अन्यथा
परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकी दिली, असे प्रविणने माध्यमांना सांगितले. ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत मजल मारणाऱ्या आणि अत्यंत प्रतीकूल परिस्थितीशी सामना करत यस मिळवणाऱ्या खेळाडूच्या घरात घुसण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल करत पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी जाधव कुटुंबियांच्या संरक्षणासाठी सूचना द्याव्यात,अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.