Shirur Lok Sabha Election Result 2024 – शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (महाविकास आघाडी) उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा दणदणीत विजय झाला आहे. 1 लाख 50 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरविण्यात आले.
दरम्यान, सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. कोल्हे यांनी महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केले आहे.
सविस्तर आकडेवारी अपडेट होत आहे.