Lok Sabha Result 2024 (Raigad) : अजित पवारांना दिलासा, रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी…
Updated On:

Lok Sabha Result 2024 (Raigad) : अजित पवारांच्या लोकसभेचे चार उमेदवार धोक्यात असताना रायगडमधून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रायगडमध्ये सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी विजय संपादन केला आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या अनंत गितेंचा सुनिल तटकरे यांनी तब्बल 82 हजारांच्या फरकाने पराभव केला आहे.
अंतिम निकालाची आकडेवारी
1. सुनिल तटकरे (राष्ट्रवादी, अजित पवार गट) : 5 लाख 8 हजार 352
2. अनंत गिते (शिवसेना,ठाकरे गट) : 4 लाख 25 हजार 568
3. कुमुदिनी चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) : 19 हजार 318
दरम्यान, एक्झिट पोलमध्ये तर सुनील तटकरे पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष मत मोजणीच्या दिवशी सुनील तटकरे यांनी विजय मिळवला आहे.





