नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढील आठवड्यात 10 दिवसांच्या विपश्यना ध्यान कोर्ससाठी रवाना होतील, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.
ते दर वर्षी या दिवसात विपश्यना ध्यान शिबीराला हजर राहातात. वेळापत्रकानुसार दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर केजरीवाल १९ डिसेंबर रोजी अज्ञात स्थळी रवाना होतील.
विपश्यना हे एक प्राचीन भारतीय ध्यान तंत्र आहे ज्यामध्ये अभ्यासक त्यांचे मानसिक आरोग्य पुनर्संचयित करण्यासाठी दीर्घकाळापर्यंत, मौन बाळगून ध्यानाचा सराव करतात.
मुख्यमंत्री केजरीवाल दीर्घकाळापासून विपश्यनेचा सराव करत आहेत आणि यासाठी ते गेल्या काही वर्षांत बेंगळुरू आणि जयपूरसह अनेक ठिकाणी गेले आहेत. यंदा ते १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत हे शिबीर करणार आहेत.
दिल्लीतच १९ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, त्या बैठकीला त्यामुळे ते उपस्थित राहतील की नाही या विषयी साशंकता निर्माण झाली आहे.