CAR Tips – देशातील अनेक राज्यांमध्ये कमी तापमानाबरोबरच धुकेही कायम आहे. त्यामुळे गाडी चालवताना अडचण येत आहे. हिवाळ्यात कार चालवताना विंडशील्डवर धुके साचू लागते. याची मुख्य कारणे कोणती आहेत आणि विंडशील्डमधून धुके कसे काढता येईल?याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
तापमानातील फरकामुळे धुके तयार होतात
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात, तापमानात घट झाली की, अनेकदा गाडीच्या आतल्या काचेवर धुके साचते. कार चालवताना असे अनेक वेळा घडते. त्यामुळे वाहने चालवताना मोठी अडचण होत असते. काचेवर वाफ येण्याचे मुख्य कारण म्हणजे कारच्या आत आणि बाहेरील तापमानातील फरक.
हिवाळ्यात कार प्रवास सुरू करताना, आरसे स्वच्छ केले जाऊ शकतात. पण गाडी चालवताना धुके किंवा वाफ तयार झाल्यास, स्वच्छ न केल्यास दृश्यमानता कमी होते. अशा परिस्थितीत तुमच्या गाडीजवळ कोणतेही वाहन आल्यास अपघाताचा धोका असतो.
खिडक्या उघडा
प्रवासादरम्यान थंडीमुळे काचेवर धुके किंवा वाफ तयार होत असेल तर काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अशावेळेस कार चालवताना तुम्ही खिडकी किंचित उघडू शकता. असे केल्याने बाहेरून थंड हवा गाडीत येईल, त्यामुळे आत आणि बाहेरील तापमानात फारसा फरक पडणार नाही. याशिवाय, असे केल्याने कारच्या केबिनमधील आर्द्रता देखील बाहेर जाईल आणि बाहेरून ताजी हवा देखील कारच्या आत येईल. खिडकी थोडीशी उघडल्याने बराच वेळ कार चालवतानाही वाफ जमा होण्यास प्रतिबंध होतो.
असा एसी सेट करा
हिवाळ्याच्या मोसमात कार ब्लोअर विंडशील्डवर सेट करा. असे केल्याने, एसीची हवा थेट विंडशील्डवर जाईल आणि वाफ काढून टाकेल. असे केल्याने कोणतीही हानी होत नाही, उलट कार चालवताना केबिनमध्ये थोडीशी उबदारता राहते.