पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. तर, दुरीकडे भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने देखील या जागेवर आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने ‘नाना काटे’ यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले हे उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथ पत्रातून ही माहिती समोर आली असून, कुणाकडे किती संपत्ती आहे हे आज आम्ही सांगणार आहोत…
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्याकडे 2 किलो सोन्यासोबतच 23 कोटींची संपत्ती आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्याकडे एकूण 19 कोटींची संपत्ती असून, ज्यामध्ये 35 तोळे सोन्याचा समावेश आहे. ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे तब्बल 35 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या निवडणुका पडणार आहेत.