मा. आमदार पवार, मा.जि.प.अध्यक्ष कंद यांची उपस्थिती
उरुळी कांचन- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिखर बॅंक घोटाळा प्रकरणी सक्त संचालयानाकडून (ईडी) गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ उरुळी कांचन येथ कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यावेळी शहरातून निघालेल्या निषेध फेरीत माजी आमदार अशोक पवार आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे दोघेही उपस्थित होते. पवार आणि कंद हे दोघे शिरूर-हवेली मतदार संघातून विधानसभेसाठी इच्छुक तसेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे येथील मिरवणुकीत ते सहभागी झाल्याने याबाबतची चर्चा झडली होती.
उरुळी कांचन येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आज मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातून निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, हवेली राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जि. प. सदस्य अमित कांचन, जि. प. सदस्या किर्ती कांचन, बाळासाहेब मुरकुट, विजय तुपे, सोपान कांचन, कांतीलाल चौधरी, सुभाष बगाडे, डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थचे चेअरमन राजेंद्र कांचन, शंकर कड, सुभाष बगाडे, सोनबा चौधरी, सुभाष जगताप, राजेंद्र बाठे, तुकाराम कांचन, योगिनी कांचन, अनिल साळवे, चक्रधर ज्वेलर्सचे मालक संतोष कांचन, जे.बी.सराफ श्रीकृष्ण बेदरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उरूळीकांचन मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठ, शाळा बंद ठेवण्यात होती तर वैद्यकिय सेवा सुरु होत्या. बंदच्या काळात लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, सोमनाथ चित्तारे, शशिकांत पवार, अमोल भोसले, सचिन पवार यांनी बंदोबस्त ठेवला होता.