नवी दिल्ली – कॉंग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहु यांच्याशी संबंधित ठिकाणांवरूस साडेतीनशे कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेली एक टिप्पणी आता विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना एका कार्यक्रमात बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की तंत्रज्ञानाच्या विदयार्थ्यांनीआता असे एक मशीन तयार करावे की जे न थांबता असंख्य नोटा मोजू शकेल.
आयआयटीच्या इंडियन स्कूल ऑफ माइन्स येथ दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. साहु प्रकरणाच्या अनुशंगाने धनखड यांनी केलेली ही टिप्पणी विशेष लक्षवेधी ठरली. ते पुढे म्हणाले, आता देशात भ्रष्टाचाराला मुळीच थारा नाही. सत्तेच्या वर्तुळात भ्रष्ट घटकांना निष्प्रभ करण्यात आले आहे. अगोदर लोकांचा असा विश्वास होता की ते कायद्यापेक्षा मोठे आहेत. मात्र आता कायद्यापासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही.