पुणे – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ काहींनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. सध्या पोलीस अधिकारी याबाबत सखोल चौकशी करीत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनेकांनी हा गौतमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर देखील केला असून, अद्यापही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
महिला आयोगाने घेतली व्हिडिओची दखल…
महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. १/३ @MahaCyber1 @DGPMaharashtra
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 26, 2023
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत दखल घेतल्याचं सांगितलं आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात… ‘महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे.’ अशी माहिती रुपाली चाकणार यांनी दिली.
आपल्या ट्विटमध्ये त्या पुढे म्हणतात, ‘लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.’ असं देखील त्यांनी सांगितलं आहे.