अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद नुकतेच मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या भव्य उद्घाटनाला उपस्थित होते. या कार्यक्रमातील या जोडप्याचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यातील एका फोटोमध्ये, सबा पोज देत होती तर दुसरीकडे ऋतिक बॅकग्राउंडमध्ये तिच्या हिल सॅन्डल पकडताना दिसला आहे. आता हे फोटो पाहिल्यानंतर चाहते हृतिकचे कौतुक करत आहे. ‘असली जेंटलमैन’ लिहत या फोटोवर चाहते लाईकचा वर्षाव करत आहे.
फॅशन डिझायनर अमित अग्रवाल यांनी NMACC इव्हेंटमधील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो सबा आझादसोबत पोज देत आहे. सबा रेड कलरच्या फ्यूजन गाऊनमध्ये दिसत आहे. मात्र लोकांची नजर मागे उभ्या असलेल्या हृतिकवर पडली, जो सबाची हिल सॅन्डल पकडलेला दिसत होता.
या कार्यक्रमानंतर हृतिक आणि सबाने सोशल मीडियावर एकत्र काही फोटोही शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘विथ लेडी इन रेड’. तर सबाने लिहिले आहे की, ‘Ro and Sa’s night out!’ गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघे डिनर डेटवर होते. तेव्हा पासून सबा आणि हृतिकच्या नात्याची बातमी समोर आली होती.
या कार्यक्रमानंतर हृतिक आणि सबा मुंबईतील एका कॅफेबाहेर स्पॉट झाले. दोघांनी मॅचिंग ब्लॅक कलरचे पोशाख परिधान केले होते. हृतिक पापाराझींसमोर सबाचा हात धरताना दिसला.