Ajay Devgan: अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ (Singham Again) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटासाठी अजय देवगणने (Ajay Devgn) खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात अजय देवगणसह रणवीर सिंह (Ranveer Singh), अक्षय कुमार (Akshay Kumar), दीपिका पदूकोन (Akshay Kumar) या सारखी तगडी कलाकार मंडळी आहे. या चित्रपटातील त्यांचे पोस्टर देखील शेअर करण्यात आले आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अजय देवगण त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला आहे. या सिनेमाच्या अॅक्शन सीक्वंसच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला दुखापत झाली आहे. ‘सिंघम अगेन’ शूटिंग मुंबईतील विले पार्ले परिसरात सुरू होते. अॅक्शन सीन शूट करताना अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर सेटवर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. थोडा वेळ ब्रेक घेऊन त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली.
‘सिंघम अगेन’ या चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी (Rohit Shetty) करत आहे. या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अजयसह करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि दीपिका पादुकोणदेखील या सिनेमाचा भाग आहेत. रणवीर सिंह आणि अक्षय कुमार देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रोहित शेट्टीचे ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.