बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलची हिरो ते खलनायकाची भूमिका सर्वांचा आवडली आहे. आज त्याचा वाढदिवस असून त्याने वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना खास भेट दिली आहे. बॉबी देओलने ‘कांगुवा’ चित्रपटातील त्याचा लुक चाहत्यांसोबत शेअर आहे. प्रेक्षक त्याच्या चित्रपटातील या लूकवर लाईक्सचा वर्षाव करत आहे.
View this post on Instagram
ॲनिमलमध्ये खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर आता बॉबीला प्रेक्षक पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत बघणार आहे. ‘कांगुवा’मध्ये बॉबीला खलनायकाची भूमिका देण्यात आली आहे.या पोस्टरमध्ये बॉबी पूर्णपणे दक्षिणेच्या रंगात रंगलेला दिसत आहे. लांब केस, एक भितीदायक डोळा, गळ्यात हाडांची माला. बॉबीचा असा लूक याआधी कधीच दिसला नसेल.
ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स म्हणाला, ‘ॲनिमल’मध्ये साकारलेली खलनायकाची भूमिका ‘कांगुवा’च्या खलनायकाच्या तुलनेत फिकी पडणार आहे. खुद्द बॉबी देओलने हे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. निर्दयी, शक्तिशाली, अविस्मरणीय असे कॅप्शनही त्याने लिहिले आहे. हे तीन शब्द पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की हे पात्र अपेक्षेपेक्षा जास्त खतरनाक असणार आहे.
सूर्याच्या ‘कंगुवा’चे दिग्दर्शन शिवाने केले आहे. बॉबी देओलशिवाय दिशा पटानीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे छायाचित्रण वेत्री पलानीसामी यांनी केले असून संगीत ‘रॉकस्टार’ देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे.