Bihar Political Updates in Marathi – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्या दलबदलू राजकारणासाठी देशभरात ओळखले जातात. बिहार विधानसभा निवडणुकांनंतर नितीश कुमार यांनी अशीच पलटी मारत भाजपला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता हेच नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारण्याच्या तयारीत आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीश कुमार ही राजकीय खेळी खेळत असल्याने नितीश कुमार यांच्या या पलटीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय जनता दलासोबतचा संसार मोडून पुन्हा एकदा भाजपकडे येणाऱ्या नितीश कुमार यांचे खुल्या दिलाने स्वागत करण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.
नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा जुळवून घेण्याबाबत दिल्लीदरबारी खलबतं सुरु असल्याची माहिती आहे. अशातच बिहार भाजपचे भाजपचे प्रभारी विनोद तावडे राजधानी पटण्यामध्ये पोहोचले आहेत. ( Bihar Political Updates in Marathi )
विनोद तावडे जनता दल (युनायटेड) व भाजपचे युती सरकार अस्तित्वात आणण्यासाठी हालचालींना वेग देतील. आज संध्याकाळपर्यंत याबाबतची घोषणा केली जाण्याची देखील शक्यता आहे.
कधी राजदला तर कधी भाजपला धोका । Bihar Political Updates in Marathi
२०२० बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये, नितीश कुमार भाजपसोबत युतीमध्ये लढले होते. मात्र निकालानंतर त्यांनी, राजदसोबत घरोबा केला.
२०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यामागे देखील नितीश कुमार हे एक प्रमुख चेहरा होते. मात्र लोकसभा निवडणुका जवळ येताच नितीश कुमार यांनी पलटी मारली आहे.