नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागे पर्यंत लोकसभेचे कामकाज सुरू होऊ देणार नाही असे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी सांगितले. चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्म यांचा उल्लेक ‘राष्ट्रपत्नी’ असा केला होता. त्या टिप्पणीवरून गुरुवारी मोठा राजकीय वाद निर्माण झाला.
तथापि अधीर रंजन चौधरी यांनी या प्रकरणात माफी मागितली असून आपला हिंदी भाषेचा नीट अभ्यास नसल्याने आपल्याकडून ती टिप्पणी अनावधानाने झाली आहे. परंतु भाजप सदस्य मात्र या प्रकरणात सोनियांनी माफी मागावी यासाठी अडून बसले आहेत ही त्यांची मुजोरी आहे असे राज्यसभेतील कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले आहे. यावर दुबे म्हणाल की भाजप आदिवासी समाजाचा अपमान सहन करणार नाही. श्रीमती गांधींच्या माफीनंतरच लोकसभेचे कामकाज चालेल”.