BJP on Congress Manifesto 2024| लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात पक्षाकडू न5 न्याय आणि 25 हमींचं आश्वासन देण्यात आले आहे. यात 30 लाख नोकऱ्या, गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक 1 लाख रुपये, जात जनगणना, एमएसपीला कायदेशीर दर्जा, मनरेगा मजुरी 400 रुपये, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासारखी आश्वासन देण्यात आली आहे. मात्र भाजपकडून काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर टीका करण्यात आली आहे.
काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात न्यूयॉर्क आणि थायलंडचे फोटो वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेद्वारे काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या जाहीरनाम्यात पर्यावरण विभागात जे फोटो छापले गेले आहेत, ते राहुल गांधींच्या थायलंड या आवडत्या देशाचे असल्याचे त्रिवेदी यांनी म्हंटले आहे. BJP on Congress Manifesto 2024|
Because the Congress couldn’t find anything to malign India, they used a picture of New York’s filthy Buffalo river, and tried to pass it off as a water body in India.
Can a party that is so loathing of India, ever be allowed to govern India? But then what can one expect from RG? pic.twitter.com/itoZ8YSXNJ— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) April 5, 2024
चार पिढ्या आणि प्रदीर्घ काळ देशावर राज्य करणारी काँग्रेस आता चमत्कार घडवेल असा दावा करत आहे. मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यात परदेशाचा फोटो दाखवण्यात आला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जलव्यवस्थापनावर दिलेला फोटो न्यूयॉर्कमधील बफेलो नदीचा असल्याचे सांगितले. पर्यावरण स्वच्छतेबाबत पेजवरील फोटो थायलंडचा आहे. अशा परिस्थितीत वास्तव आणि खोटे यातला फरक पूर्णपणे स्पष्ट दिसत असल्याचे ते म्हणाले. BJP on Congress Manifesto 2024|
पुढे त्रिवेदी म्हणाले की, आतापर्यंत काँग्रेस नेते विदेशात जाऊन भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करत होते. पण आता तर ते विदेशातले फोटो आणि त्यांचा जाहीरनामाच उचलत आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा: