नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये उच्छाद मांडल्यानंतर आता या वादळाने आपली कूच राजस्थान दिशेने केली आहे. आज सकाळी चक्रीवादळ राजस्थानमध्ये पोहोचले असून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे, पंरतु, या वादळाचा धोका अजूनही कायम आहे. आता या चक्रीवादळाचा वाळवंटात तांडव सुरु झाला असल्याचे आहे. याचा परिणाम आता मान्सूनवर झाला असून मान्सून लांबणीवर गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नऊ जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आता चक्रीवादळाच्या निशाण्यावर आता राजस्थान असून स्थानिक प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. भारतीय हवामान विभागाने याविषयी माहिती देताना,”बिपरजॉय चक्रीवादळ लवकरच शमणार आहे,” असे म्हटले आहे.
Deep Depression (Remnant of Cyclonic Storm Biparjoy) at 0830 hours IST of today,17th June over Southwest Rajasthan adjoining Gujarat and Southeast Pakistan about 80 km south of Barmer and 210 km southwest of Jodhpur. To weaken into a Depression during next 06 hours. pic.twitter.com/eBYmTZiVPV
— India Meteorological Department (@Indiametdept) June 17, 2023
भारतीय हवामान विभागाने ट्विट करत, ‘आज, 17 जून रोजी 8.30 वाजता चक्रीवादळ बिपरजॉयचा बाडमेरपासून 80 किमी दक्षिणेस आणि जोधपूरपासून 210 किमी नैऋत्येस गुजरात आणि आग्नेय पाकिस्तानला लागून असलेल्या नैऋत्य राजस्थान येथे पोहोचलं आहे. पुढील सहा तासांमध्ये चक्रीवादळ कमकुवत होण्याचा अंदाज आहे.’
उपग्रहाच्या फोटोच्या आधारे सध्या चक्रीवादळ जोधपूरच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 36 तासांत हे चक्रीवादळ हळूहळू शमण्याची शक्यता आहे. मात्र यासह परिसरात जोरदार वारे वाहत असून विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरु आहे. चक्रीवादळामुळे येत्या 12 तासांत राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.