मुंबई – कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे सगळे काही ठप्प आहे. त्यामुळे कलाक्षेत्राला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. या गंबीर परिस्थितीत बॉलिवूड विश्वासह इतर क्षेत्रातील मंडळी देखील कोरोनाविरोधातील युद्धात पुढे सरसावत आहेत. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री ‘प्रियंका चोप्रा’ने मदतीचा हात पुढे केला आहे.
प्रियंकाने फ्रंटलाइन हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना तब्बल 20 हजार शूज देण्याची घोषणा केली आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या पोस्टमधून याबाबतची माहिती दिली.
प्रियांकाने लॉस एंजेलिसमधील करोनासाठी काम करणाऱ्या कामगारांना 10,000 जोड्या शूज पाठवल्या आहेत. तसेच पादत्राणाच्या 10,000 जोड्या भारतातील हेल्थकेअर प्रोफेशनल्सना पाठवल्या आहेत.
प्रियांकाने त्यांना क्रॉक्स शूज पाठवले आहेत, जेणेकरून कामकाजाच्या वेळेस त्यांना यातून आराम मिळू शकेल. केरळ, महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकातील सार्वजनिक, तसेच शायकीय रूग्णालयांमध्ये हे शूज पाठिवले आहेत.
दरम्यान, याशिवाय प्रियंकाने जगभरातील महिला वैद्यकिय कर्मचाऱ्यांसाठी 76 लाख रुपयांचा मदत निधीही जाहीर केला आहे.