शेलपिंपळगाव – खेड तालुक्यातील रासे या गावी भैरवनाथ महाराजांचा उत्सव शुक्रवार (दि. 18) साजरा होत आहे, त्यानिमित्ताने गावात भव्य बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा जंगी आखाडा, कै. तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्याचा व बारा गावच्या बारा अप्सरा हा लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रासे येथे शनिवारी (दि. 19) सकाळी सात वाजल्यापासून बैलगाडा शर्यतींना सुरुवात होणार असल्याची माहिती सरपंच किरण ठाकर व उपसरपंच सविता गणपत मुंगसे यांनी दिली. गुरुवार (दि. 17) सकाळी 8 वाजल्यापासूनच रासे गावामध्ये बैलगाडा मालकांची व शौकिनांची मोठी गर्दी टोकन मिळवण्यासाठी उसळली होती.
यावेळी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत रासे यांच्या योग्य नियोजनाने 277 बैलगाडा मालकांना शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या कार्यक्रमांचे योग्य नियोजन माजी सरपंच विजय शिंदे, अध्यक्ष सुनील मुंगसे, सदस्य लक्ष्मण शिंदे, उद्योजक विकी वाडेकर, तुषार डावरे, शिवाजी शिंदे, पै. निखिल शिंदे, सदस्य रमेश मुंगसे, शंकर थोरात, श्वेता मुंगसे, श्वेता केदारी, वैशाली मुंगसे, सुजता शिंदे, निता केदारी, माऊली वाडेकर, विलास मुंगसे यांच्या सह ग्रामस्थ रासे व यात्रा कमिटी हे करत आहेत.
करोनामुळे बंद असणाऱ्या यात्रा आणि ग्रामीण भागामध्ये वाढते शहरीकरण यामध्ये रासेगावचा जुना बैलगाडा घाट बंद पडल्याने रासे गावातील उद्योजक जगन्नाथ शिंदे व परिवाराच्या विशेष योगदानाने नवीन घाट बांधणी करण्यात आला असून अनेकांनी वस्तूरुपी मदत घाट बांधणीच्या कामाला केल्याने शिवजयंतीच्या दिवशी होणाऱ्या शर्यतीसाठी नवीन घाट सज्ज करण्यात आला आहे.