Happy Women’s Day 2024 । देशात बदल घडवून आणणे वाटते तितके सोपे नाही.आम्ही हे असेच म्हणत नाही.देशात येणाऱ्या प्रत्येक बदलामुळे कुणाचे आयुष्य संपते तर कुणी लढताना जीव धोक्यात घालतो. आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला एका महिलेच्या संघर्षाची गोष्ट सांगणार आहोत. भंवरी देवीच्या संघर्षामुळे भारतात बनवण्यात आलेल्या रेप कायद्यात मोठा बदल झाला. बालविवाहासारखी वाईट प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे.
Happy Women’s Day 2024 । बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलली
उत्तर प्रदेशातील भटेरी गावात राहणाऱ्या भंवरी देवी यांनी जुन्या काळातील वाईट प्रथा बंद करण्यासाठी खूप संघर्ष केला. 1980 आणि 1990 च्या दशकात, भंवरी देवी ग्रामीण स्त्रीवादाचा एक ब्रँड होत्या. त्यांनी बालविवाह प्रथेविरुद्ध नेतृत्व बदलाचे उदाहरण दिले. भंवरी देवी यांना ग्रामीण महिलांचे जीवन बदलायचे होते. 1992 मध्ये भंवरी देवी यांनी नऊ महिन्यांच्या नवजात बालकाचा बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांच्यावर बलात्कार झाला. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर नवरीच्या नातेवाईकांनी बदला म्हणून भंवरीदेवीवर बलात्कार केला. भंवरी देवीवरील सामूहिक बलात्कार हा किरकोळ गुन्हा मानला गेला, त्यानंतर दोषींना केवळ नऊ महिन्यांची शिक्षा झाली.1995 मध्ये सर्व गुन्हेगार निर्दोष सुटले.
Happy Women’s Day 2024 । भंवरीदेवीमुळे ‘विशाखा कायदा’ आला
1997 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने विशाखा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि सांगितले की,’महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी नियम आणि कायदे केले गेले. 2013 मध्ये विशाखा निकालाच्या आधारे कार्यालयातील महिलांच्या सुरक्षेसाठी संसदेत कायदा करण्यात आला.’
Happy Women’s Day 2024 । संगीताशी विशेष नाते
भंवरी लग्नानंतर संगीतात रुजू झाल्या. भंवरी यांनी फेमस शो कोक स्टुडिओमध्ये त्यांच्या गायनाचे कौशल्य दाखवले. भंवरी देवी यांनी प्रादेशिक संगीतात आपली ओळख निर्माण केली आहे. भंवरी देवीसोबत घडलेल्या या प्रकरणाला 33 वर्षे झाली आहे. आजही भंवरी देवी आजही स्त्रियांच्या समस्यांवर काम करत आहे.अडचणीत असलेल्या स्त्रियांना मदत करत आहे.
हेही वाचा
महाशिवरात्रीला प्रसाद म्हणून बनवली जाते भांगाची थंडाई, जाणून घ्या भांग पिण्याचे ५ जबरदस्त फायदे….