कोपेनहेगन – युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियम व डेन्मार्क या संघांनी अपेक्षेप्रमाणे आपापल्या सामन्यात विजयी घोडदौड कायम राखत बाद फेरीत प्रवेश केला.
मंगळवारी पहाटे झालेल्या पहिल्या सामन्यात बेल्जियमने फिनलंडला 2-0 असे पराभूत केले. बेल्जियमकडून लुकास ऱ्हादेकीने 74 व्या मिनिटाला, तर रोमेलु लुकाकुने 81 व्या मिनिटाला गोल केले. या विजयाच्या जोरावर बेल्जियमने थाटात बाद फेरी गाठली आहे.
दुसऱ्या सामन्यात डेन्मार्कने बलाढ्य रशियाचा 4-1 असा दणदणीत पराभव केला. या विजयाच्या जोरावर डेन्मार्कने बाद फेरी गाठली आहे.
डेन्मार्ककडून मिकेल दम्सगार्डने 38, युसुफ पोलसेनने 59, आंद्रिया ख्रिस्तेनने 79 व जोअकीम म्हेलने 82 व्या मिनिटाला गोल केले. रशियाकडून एकमेव गोल आत्रेम झ्युबाने 70 व्या मिनिटाला केला. मात्र, त्यानंतर त्यांना डेन्मार्कचा बचाव भेदता आला नाही.