जगात भेट देण्यासाठी एकापेक्षा एक ठिकाणे आहेत. मग ते इतिहास आणि संस्कृतीशी निगडीत पर्यटन स्थळे असोत किंवा अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य असलेली ठिकाणे असोत. या पृथ्वीतलावर अशा अनेक जागा आहेत जे आपल्या कोणत्या ना कोणत्या वैशिष्ट्यामुळे लोकांना आकर्षित करतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका अद्भुत आणि आलिशान ठिकाणाविषयी सांगत आहोत, जिकडे गेल्यानंतर लोक थक्क होतात. हे नैसर्गिक ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक स्थळ नाही. तर, पृथ्वीच्या खोलात अशी एक आश्चर्यकारक जागा आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लोकांना या ठिकाणाची माहिती होत असल्याने ते अनुभव घेण्यासाठी येथे जात आहेत. तुम्हालाही प्रवासाची व साहसाची आवड असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि राहायला आवडत असेल, तर तुम्ही इथेही जाऊ शकता. चला तर, या ठिकाणाविषयी जाणून घेऊया.
पृथ्वीपासून 1375 फूट खोलीवर एक आलिशान हॉटेल आहे, जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे आणि त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या ठिकाणाचे वर्णन जगातील सर्वात खोल हॉटेल किंवा ‘डिपेस्ट हॉटेल’ म्हणून केले जात आहे. येथे जाण्याचा मार्ग आणि छायाचित्रे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
पृथ्वीच्या 1375 फूट खाली बांधलेल्या या भव्य लक्झरी हॉटेलमध्ये पाहुण्यांना राहण्यासाठी एकापेक्षा जास्त खोल्या आहेत. ‘द डीप स्लीप’ नावाचे हे हॉटेल नॉर्थ वेल्समधील स्नोडोनिया पर्वतांच्या खाली असलेल्या खाणींमध्ये आहे, जिथे ट्रेकिंग करावे लागते.
या हॉटेलमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट, बूट, दिवे यासह सुरक्षा साधने दिली जातात. सर्व उपकरणांसह सुसज्ज लोकांना तज्ञांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे या भूमिगत हॉटेलमध्ये नेले जाते. खडकाळ वाटांनी मोठ्या उत्साहाने या हॉटेलपर्यंत पोहोचणे लोकांना आवडते.
बनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर दोन लोकांना येथे एका खाजगी केबिनमध्ये राहायचे असेल तर त्यांना एका रात्रीच्या मुक्कामासाठी 36,003 रुपये मोजावे लागतील. आणि जर तुम्हाला गुहेच्या खोलीत राहायचे असेल तर 56,577 रुपये मोजावे लागतील.
या सर्व खर्चामध्ये चहा, पाणी, नाश्ता यांचा समावेश असून जेवणात शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही सुविधा दिल्या जातात. तुम्ही येथे फक्त 24 तासांसाठी रूम बुक करू शकता.
हे हॉटेल ‘गो बिलो’ नावाची कंपनी चालवत आहे. ज्याने एप्रिल 2023 मध्येच हॉटेल सुरू केले आहे. जे लोक इथे येतील, त्यांना वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळेल, असा विश्वास कंपनीला आहे.
हॉटेलच्या फोटोंमध्ये लोक दोरीच्या साहाय्याने डोंगर ओलांडताना आणि खडबडीत रस्त्यावरून हॉटेलपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. पृथ्वीच्या खोलवर असलेल्या या हॉटेलमध्ये तुम्हाला खूप शांतता मिळणार आहे आणि विशेष म्हणजे येथे वीज आणि वायफाय सुविधा देखील उपलब्ध आहेत. मात्र येथे धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
तुम्हालाही साहसाची आवड असेल आणि नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल, तर तुम्ही या अंडरग्राउंड हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव जरूर घ्या. इथे गेल्यावर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल.