नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वेळ लागतो. त्यामुळे बॅटरी स्वॅपिंग ही संकल्पना लोकप्रिय झाल्यास इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस चालना मिळेल असे कायनेटिक एनर्जी अँड पावर सोल्युशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी सांगितले.
इंद्रप्रस्थ गॅस आणि कायनेटिक ग्रीन कंपनीने पहिले बॅटरी स्वॅपिंग स्टेशन एनर्जी कॅफेचे अनावरण केले. येथे इलेक्ट्रिक तीनचाकी व इलेक्ट्रिक दुचाकीची श्रेणी बॅटरी स्वॅपिंग सुविधा आहे. त्या म्हणाल्या की, अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लवकरच सरकारकडून सर्वसमावेशक बॅटरी स्वॅपिंग धोरण जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.
ईव्ही लिथियम-आयन बॅटरीशविाय ग्राहकांना विकता येऊ शकते आणि ड्रायव्हर्स बॅटरी ऍज ए फ्यूएलसाठी लहान रक्कम भरत पे पर युज संकल्पनेनुसार बॅटऱ्यांचा लाभ घेऊ शकतात. यामुळे ईव्हीची किंमत निम्मी होऊ शकते. लांबच्या अंतरापर्यंत जायचे असेल तर चालक डिस्चार्ज बॅटरीच्या जागी चार्ज बॅटरी स्वॅप करू शकतात.
बॅटरी स्वॅपिंगसाठी फक्त 2 मिनिटे लागतात आणि ग्राहकांना भविष्यात बॅटऱ्या चार्जिंग करण्याबाबत किंवा नवीन बॅटरी खरेदी करण्याबाबत चिंता करावी लागणार नाही. बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स फ्यूएल पंपांप्रमाणे सेट अप करता येऊ शकतात.
हे तंत्रज्ञान दुचाकी व तीनचाकी सारख्या लाइट इलेक्ट्रिक वेईकल्ससाठी उपयुक्त आहे, जेथे बॅटऱ्या वजनाने हलक्या व लहान आहेत, ज्यामुळे मॅन्युअली सुलभपणे स्वॅप करता येऊ शकतात. एक बॅटरी स्वॅप करण्याची किंमत पेट्रोल किंवा डिझेलच्या किंमतीपेक्षा कमी असेल. ज्यामुळे ग्राहकांना सोयीसुविधा मिळण्यायसोबत त्यांच्या प्रवासाचा खर्च कमी होईल.