डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील सोनगाव हद्दीत सहा टायर हायवा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात बारा वर्षीय मुलाचा देखील रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातामध्ये वडील आणि मुलगा दोघांचाही मृत्यू झाल्याने सातारा जिल्ह्यातील आसू गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात वडील सतीश पवार हे अपघात ठिकाणी जागीच ठार झाले होते. तर मुलगा आर्यन पवार हा गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यानच त्याचा देखील मृत्यू झाला असल्याचे पोलीस हवालदार गणेश पवार यांनी सांगितले आहे.
सोनगाव येथे झालेल्या अपघातामध्ये हायवा गाडीचा चालक अपघात होताच फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या अपघातात सतीश रामदास पवार राहणार आसू ता. फलटण जी. सातारा वय वर्ष 38 आणि आर्यन सतीश पवार वय वर्ष 12 असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत