बारामती – बारामती सहकारी बँकेने (Baramati Cooperative Bank) आर्थिक वर्षअखेरीस ३१ मार्च २०२४ अखेर ३५८४ कोटींचा व्यवसाय करीत ६७.४० कोटी रूपये तरतुदीपूर्व ढोबळ नफा प्राप्त केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. (Baramati Bank’s record gross profit of 67 crores)
बँकेच्या आजवरच्या मिळालेल्या ढोबळ नफ्यामध्ये यंदाचा ढोबळ नफा विक्रमी असून, सर्व तरतुदी पुर्ण करीत बँकेने ५ कोटी ७० लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बँकेचे नक्त मुल्य १५४ कोटींवर पोहोचले आहे. बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली करत एनपीएचे (अनुत्पादक जिंदगी) प्रमाण कमी करण्यात यश प्राप्त केले आहे.
बँकेचे पुणे, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, रायगड अशा सहा जिल्हयांत कार्यक्षेत्र असून, बँकेच्या ३६ शाखा व एक विस्तारित कक्ष आहे. ई टॅक्स, ई स्टॅपिंग, पॅन कार्ड, मोबाईल बँकींग, विमा सेवा, युपीआय पेमेंट या सुविधांसह आरटीजीएस, एटीएम सुविधा दिल्या जातात. बँकेची स्वतःची संगणकीय प्रणाली विकसित आहे. नेट बँकिंगची सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहे. लवकरच रिझर्व्ह बँकेकडून नेट बँकिंगची परवानगी मिळेल, असे अध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले.