Nana Patole On Ashok chavhan : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यातच विविध पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोईंग देखील जोरात सुरु आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा पेच कायम आहे.अशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांचा काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता असा आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे.
एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना भाजपने राज्यसभेवर देखील पाठवले. मात्र चव्हाण यांच्या काँग्रेस सोडल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. अशात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांचा काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता असा आरोप करून खळबळ उडवून दिली. | Nana Patole On Ashok chavhan
काँग्रेसमध्ये काय राहिलंय अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली होती. यावर नाना पटोले यांनी चव्हाणांना उत्तर देत म्हणाले,”अशोक चव्हाण यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी काँग्रेसच्या नावावर खूप कमावलं आहे. उलट काँग्रेसला संपवण्याचा चव्हाणांचा प्लॅन होता” असा आरोप देखील पटोले यांनी केला. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. | Nana Patole On Ashok chavhan
“चव्हाणांच्या भोकर विधानसभेत त्यांची काय अवस्था आहे ? लोक त्यांना येऊ देत नाही ही अवस्था आपण बघत आहोत. त्यामुळं काँग्रेसवर बोलणं त्यांनी आता टाळावं. काँग्रेसच्या नावानं खूप राजयोग भोगला. त्यांनी काँग्रेसला कसं संपवायचं याचा त्यांनी प्लॅन केला होता, बरं झालं आज ते आमच्यात नाही” अशा शब्दात पटोले यांनी चव्हाणांचा समाचार घेतला. | Nana Patole On Ashok chavhan
FREE FREE FREE ! एक रुपयाही खर्च न करता 50 दिवस चालणार इंटरनेट.. Jio ने सुरु केला धमाकेदार प्लॅन