लंडन – करोनामुळे विविध आजार समोर येत आहेत. ज्या आजारांच कधी नाव ऐकलं नाही, असे आजार अनेकांना होताना दिसत आहेत. त्यातच आता लंडनमधून एका अनोख्या आजाराची माहिती समोर आली आहे. या आजाराची शिकार पाच महिन्यांची चिमुरडी झाली आहे.
ब्रिटनमध्ये एका दुर्मिळ आजारामुळे पाच महिन्यांच्या चिमुरडीच्या शरिराचं रुपांतर दगडात होत आहे. या आजाराला Fibrodysplasia Ossificans Progressiva म्हणतात. या आजारामुळे माणसाच्या शरिराचं रुपांतर दगडात होतं. या चिमुरडीच्या पालकांनी जगभरातील पालकांना या आजाराच्या लक्षणासंदर्भात सावधतेचा इशारा दिला आहे.
पीडित चिमुरडीचं नाव लेक्सी रोबिन्स आहे. हा दुर्मिळ आजार २० लाख लोकांमध्ये एकाला होतो. लक्सिचा जन्म ३१ जानेवारी रोजी झाला. तिचे पालक अलेक्स आणि दवे ब्रिटन येथील रहिवाशी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुलीच्या हाताच्या आंगठ्यांमध्ये हालचाल दिसून आली नाही. तर पायाचे आंगठे मोठे झाले होते. डॉक्टरांना लेक्सीच्या आजार समजण्यासाठी बराच कालावधी लागला होता.
या आजारामुळे मांसपेशी आणि हाडांना जोडणारे उतक हाडात बदलतात. त्यामुळे शरीर दगडासारखं कठोर होतं. वयाच्या २० वर्षांनंतर या आजाराने पीडित व्यक्ती आंथरुनावर पडतो. या आजारात रुग्ण ४० वर्षांपर्यंत जगू शकतो.
शरीर कठोर झाल्यामुळे पीडित चिमुरडीला आता इंजेक्शन किंवा लस देणंही शक्य नाही. ती मोठी झाल्यानंतर बाळाला जन्म देऊ शकणार नाही. आता तज्ज्ञ डॉक्टर या लेक्सीचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.