चीन – साऊथ कोरियाच्या बड्या डेअरी कंपनीने केलेल्या जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. या जाहिरातीचा निषेध सध्या सोशलवर होतांना दिसत आहे. जाहिरातीत महिलांची तुलना गाईंसोबत केल्यामुळे या जाहिरातीवरनं राजकारण भलतंच तापलेलं आहे.
एक इंग्रजी वृत्ताच्या माहितीनुसार, सियोल मिल्कने आपली एक जाहिरात मार्केटमध्ये आणली होती. ज्यामध्ये एक माणूस जंगलात व्हिडिओ शुटिंग करतोय. काही महिला जलधारेतून पाणी पिताना त्याला दिसतात. मग तो त्या महिलांचं शुटिंग करु लागतो आणि जसा तो जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तशा त्या महिला गाईंमध्ये रुपांतरित होतात. पण या जाहिरातीमुळे महिलांच्या भावना दुखावल्या आहेत.
दरम्यान, या जाहिरातीचा सोशलवर निषेध होताच सियोल मिल्क कंपनीने माफी मागितली आहे. ते म्हणाले आमच्या कडून यानंतर कधीच अशी चूक होणार नाही.’