सातारा – आंतरजातीय विवाह केल्यास सरकारकडून तीन लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून सातारा शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रिन्स भगत, विजया भगत, आलिशा भगत व प्रिन्स याच्या दोन मावशा (नावे माहीत नाहीत) या पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित प्रिन्स याने पीडित
युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्यास सरकारकडून तीन लाख रुपयांचे अनुदान मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने पीडितेशी लग्न केले. तिला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार केले. तिचे काही अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या कृत्यात त्याला इतर संशयितांनी मदत केल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. के. माने तपास करत आहेत.