बारामती- शहरात करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाचा प्रत्येक विभाग “अर्लट’ राहून आपले कार्य बजावित आहेत. तर संचारबंदी कायद्याचे उल्लंघन होवू नये म्हणून शहरात आता मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे. त्यांचा जेवणाचा प्रश्न पोलीस विभागाला भेडसावत असताना, आम्ही बारामती सायकल क्लबच्या सदस्यांना जेवण देण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी तात्काळ जेवण देण्याची सुविधा पहिल्या दिवसांपासून बंदोबस्ताला असणारे कर्मचाऱ्यांच्या पॉईंटवर अविरत सुरू केली असून ती अखंड सुरू आहे.
आज जेवणाच्या मोकळ्या डब्याचा प्रश्न निर्माण झाला होता तो प्रश्न सोडवणे तसेच अडचणीच होत म्हणून आम्ही क्रेडाइच्या सदस्यांना फोन करून विनंती केली असता. त्यांनी व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ 18 हजार रुपये रोख स्वरूपात आम्हास देऊन, पुढील 15 दिवसांच्या जेवणाच्या मोकळ्या डब्याचा प्रश्न सोडवला आहे. त्याचबरोबर भिगवण रस्त्यावर वडूजकर इस्टेट, श्रीरामनगर येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना चहा व नाश्त्याचे सोय आम्ही स्वतः करतो असे अविनाश लगड व त्यांच्या सहकार्यांनी सांगितले.