लंडन :- इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील पाचवी व अखेरची निर्णायक कसोटी आजपासून(Time 3.30 PM IST) येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
चौथा सामना संततधार पावसामुळे अनिर्णित राहिल्याने विजयाच्या स्थितीत असलेल्या इंग्लंडच्या पदरी निराशा पडली होती. आता हा पाचवा सामना जिंकत मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याची संधी त्यांना आहे.
तर दुसरीकडे ही कसोटी जिंकून ऍशेस मालिका 3-1 अशी जिंकत करंडक आपल्याकडेच राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज बनला आहे. या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात एकही बदल केलेला नसून सातत्याने अपयशी ठरलेल्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनलाही संघात कायम राखले आहे.
2001 सालानंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये ऍशेस कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ही निराशाजनक कामगिरी यंदा बदलण्यासाठी त्यांचा संघ चांगलीच लढत देईल.