काठमांडू : नेपाळमधील पुष्प कमल दहाल प्रचंड यांच्या सरकारचा आज विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळात 12 मंत्री आणि 3 उप मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रचंड यांनी पंतप्रधान पदाची शपथ 25 डिसेंबर रोजी घेतली होती. त्यानंतर 3 आठवड्यांनंतर मंत्रिमंडळाचता विस्तार करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळाबाबतच्या चर्चेसाठी पंतप्रधान प्रचंड यांच्या निवासस्थानी सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची सोमवारी बैठक झाली. त्यात मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली.
Australia : खलिस्तानींकडून आणखीन एका मंदिराचे विद्रुपीकरण; भिंतींवर हिंदूविरोधी…
सीपीएम-युएमएल पक्षाचे नेते बिमला राय पौडेल यांना पररीाष्ट्र मंत्री करण्यात आले आहे. तर त्यांच्याच पक्षाच्या हरी उपरेती यांना संरक्षण मंत्री करण्यात आले आहे. नेपाळच्या अध्यक्षा बिद्यादेवी बंडारी यांच्या निवासस्थानी सर्व नवीन मंत्र्यांचा शपथविधी झाला.