टाकळी हाजी – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक असणारे करोना प्रतिबंधक साहित्य शिरुरचे तहसीलदार लैला शेख यांच्याकडे सुपूर्द केले आहे. राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार भीमाशंकर साखर कारखान्याकडून पीपीई किट 200, हॅंन्डग्लोज 2000, मास्क 2000, सॅनिटायझर 5 लिटरप्रमाधे 100 नग याप्रमाणे असणारे करोना प्रतिबंधक साहित्य शिरूर तहसीलला देण्यात आले.