नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे यांची आज ईडीकडून दिल्ली दारू धोरणातील घोटाळा प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना आणखी एक धक्का बसला आहे. आप (AAP) सरकारमधील आणखी एका मंत्र्यांच्या घरी EDने छापेमारी सुरू केली आहे. केजरीवाल सरकारमधील समाज कल्याण मंत्री राजकुमार आनंद (Rajkumar Anand) यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे.
गुरुवारी सकाळी राजकुमार आनंद यांच्या सरकारी बंगल्यासह नऊ ठिकाणांवर ईडीचा छापेमारी सुरू झाली आहे. त्यांच्या घराबाहेर आणि इतर ठिकाणांवरही निमलष्करी दलाचे अधिकारी तैनात राहिले. मात्र, ही छापेमारी नेमकी कोणत्या कारणामुळे केली जात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
#WATCH | ED raid underway at the residence of Delhi Minister Raaj Kumar Anand in Civil Lines area. Searches started early morning today. Raids are underway at 9 premises linked to him. Details awaited pic.twitter.com/2Q0ZuFIjGo
— ANI (@ANI) November 2, 2023
दरम्यान, दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी समन्स बजावलं. त्यानुसार अरविंद केजरीवाल आज ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत. यापूर्वी सीबीआयनेही एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते.
आपचे 2 मोठे नेते आधीच जेलमध्ये गेले आहेत. कथित अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया तुरुंगात आहेत. तर खासदार संजय सिंह यांना ईडीनं अटक केली होती. याप्रकरणात अरविंद केजरीवाल यांनाही ईडीने समन्स बजावले आहे.