दिमाखदार सोहळ्यात पार पडला कराड कार्यालयाचा वर्धापन

कराड : मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात सुमारे 88 वर्षे आपले अढळ स्थान निर्माण केलेल्या “दैनिक प्रभात’ ने संस्कृतीसंपन्न आणि चारित्र्यवान पत्रकारितेचा आदर्श नेहमीच सर्वांसमोर ठेवला आहे. त्याच उद्देशाने नुकताच कराड विभागीय कार्यालयाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यात कराड, पाटण तालुक्‍यातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दैनिक प्रभातवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

पत्रमहर्षी कै. वा. रा. कोठारी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन तहसीलदार अमरदीप वाकडे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी आ. बाळासाहेब पाटील, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, कराड तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, मलकापूर नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक सागर जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, नीलकंठ पाटील, उमाकांत दीक्षित, पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, कराड नगरपालिकेचे बांधकाम सभापती हणमंत पवार, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, मनसेचे तालुकाध्यक्ष दादा शिंगण, महेश जगताप, शिवसेना कराड तालुका प्रमुख सुनील पाटील, नितीन काशिद, सहाय्यक गटविकास अधिकारी उषा साळुंखे, शिक्षणविस्तार अधिकारी सौ. जे. यु. मुलाणी, युवा नेते अभिजीत पाटील, कराड तालुका शिक्षण समिती अध्यक्ष अरुण पाटील, कार्याध्यक्ष शशिकांत तोडकर, ग्रामसेवक संघटना कायदेशीर सल्लागार जे. जी. साळुंखे, पोलीस पाटील विजय लोहार, संतोष विचारे-पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. निर्भिड, नि:पक्षपाती आणि संतुलित वृत्तांकन हे प्रभातचे वैशिष्ट्य आहे. याच उद्देशाने प्रभातने सातारा जिल्ह्यात कराडमध्ये विभागीय कार्यालय सुरू केले आहे. वाचकांनी ही प्रथम वर्धापन दिनी कराड कार्यालयास भेट देवून शुभेच्छा दिल्या. कराड-पाटण भागातील वाचकांना चांगली सेवा देता यावी, यासाठी कराड येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अल्पावधितच ते वाचकांच्या पसंतीस उतरत असून वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

वर्धापन दिनानिमित्त कराड नगरपालिकेचे गणेश जाधव, कराड पंचायत समितीच्या नलिनी कोळी, अजित मोहिते ढेबेवाडी, प्रतिभा थोरात, विवेक मस्के, अनिल घाडगे, पार्श्‍वनाथ बॅंकेचे मॅनेंजर जयराज रजपूत, पद्मसिंह पाटील आटके, विशाल पाटील येडेमच्छिंद्र, सुहास कदम सैदापूर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता सुनील भोसले वारुंजी, गुरुदेव झेरॉक्‍सचे संचालक व पदाधिकारी, संगिता ओसवाल, भाग्यश्री ओसवाल, रुपेश कुंभार, राठोड, जनार्दन सुतार, एन्व्हायरोचे अध्यक्ष जालिंदर काशिद, चंद्रकांत जाधव, विजय दिवस समारोह समितीचे सर्व पदाधिकारी, हेमंत देसाई, कृष्णा मुगदम, मुरलीधर दाभाडे, संतोष अंबवडे, विलास जाधव, सचिन पाटील, सुधीर एकांडे, जयंत कुराडे, कृषि विज्ञान केंद्राचे महाजन, संजय मस्कर, सुभाष शेवाळे, प्रकाश कोळेकर, मोहन सातपुते, मनोज पाटील, योगेश झांबरे, भवानीशंकर मोघे, अश्‍विनी मोघे, शंकर पाटील, रवींद्र माने, प्रा. सुधीर कुंभार, ओंकार मुळे यासह पत्रकार प्रतिभा राजे, महेश सुर्यवंशी, सदाशिव खटावकर, वसीम सय्यद, सुरेश दळवी, अतुल होनकळसे, मिलींद पवार, संतोष गुरव, प्रदीप रवलेकर, राजेंद्र पाटील, दीपक पवार, अमोल चव्हाण, अक्षय मस्के, माणिक डोंगरे, अस्लम मुल्ला, सुभाष देशमुखे, संदीप डाकवे, ज्येष्ठ पत्रकार उदय किरपेकर, विक्रम चन्ने, विकास भोसले, नितीन ढापरे, सागर पाटील, नितीन कुलकर्णी, संतोष दाभाडे, प्रा. अशोक चव्हाण, शरद गाडे, खंडू इंगळे, अनिल थोरात, प्रियांका पाटील, तन्मय पाटील, अजिंक्‍य गोवेकर, अभिजित पवार, प्रवीण कांबळे, सुरेश सुर्यवंशी, अनिल कदम, संतोष चव्हाण, विशाल पाटील, सुरेश पवार, संदीप कोरडे, हेमंत पवार, सचिन देशमुख, आनंदा थोरात, नारायण करपे, विनोद जामदार, अशोक मोहने, सकलेन मुलाणी, लक्ष्मण चव्हाण, राम जगताप, संदीप चेणगे, सुहास बाबर, सुनील परीट, पराग शेणोलकर, संतोष वायदंडे, संतोष खालकर, नारायण सातपुते, आनंद जगदाळे, मोहसिन संदे, दिलीपराज चव्हाण, विक्रम कुंभार, सूर्यकांत पाटणकर, संतोष पवार यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.