manjot singh : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. चित्रपटातील रणबीरच्या भावांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमल या चित्रपटात दिसलेला अभिनेता ‘मनजोत सिंग’ सध्या चर्चेत आला आहे. अॅनिमलमधून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. पण तो खऱ्या आयुष्यातील हिरोच्या रुपात सर्वांसमोर आला आहे. अभिनेत्याने एका मुलीचे प्राण वाचवले आहेत.
मनजोत सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो कोणी हा व्हिडिओ पाहतोय तो अभिनेत्याचे कौतुक करताना थकत नाही. या व्हिडिओमध्ये एक मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक लोक असतात. पण मनजोतने हिंमत दाखवली आणि सावधपणे त्या मुलीकडे धावला आणि उडी मारण्याआधीच तिला वाचवले.
View this post on Instagram
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक त्याला केवळ फिल्मी हिरोच नाही तर रिअल लाइफ हिरोही म्हणत आहेत. मात्र, हा व्हिडिओ 2019 सालचा आहे आणि याचा खुलासाही अभिनेत्यानेच केला आहे. मनजोतने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबतच त्या काळातील परिस्थितीही कॅप्शनद्वारे लिहिली आहे.
अभिनेता लिहितो की, “2019 मध्ये असे घडले की एका मुलीने आत्महत्या केली आणि देवाच्या कृपेने मी तिला वाचवू शकलो, मी योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो. आपल्या सर्वांना समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागतो कधीकधी जगणे हे धैर्याचे काम असते.’ असं तो म्हणाला.
रणबीर कपूरच्या अॅनिमलमध्ये मनजोत सिंगला त्याच्या भावाची भूमिका साकारायला मिळाली होती. या अभिनेत्याने त्याच्या साईड रोलमध्येही आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली होती. सध्या त्याचे खूप कौतुक होत आहे. त्याच्या या व्हायरल व्हिडिओला खूप लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत.