Animal Movie : अभिनेता रणबीर कपूरचा ( ranbir kapoor ) ‘अॅनिमल’ ( Animal ) चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याची बरीच चर्चा होती. रणबीरला पहिल्यांदाच धमाकेदार गँगस्टर अवतारात पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. टीझर-ट्रेलरवरूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करणार अशी शक्यता वर्तवली जात होती.
या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगचाही रेकॉर्ड तोडला. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ने रणबीर कपूरला अशा शैलीत पडद्यावर आणले आहे जे आजपर्यंत दुसरा कोणताही चित्रपट करू शकला नाही.
या जल्लोषात लोकांचा मूड इतका तयार झाला होता की चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरू होताच तिकीटांची जोमाने विक्री सुरू झाली. आगाऊ बुकिंगद्वारे या चित्रपटाने 34 कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘अॅनिमल’ला मोठी ओपनिंग मिळणार हे निश्चित होते, पण चित्रपटाला अपेक्षेपेक्षाही मोठी ओपनिंग मिळाली.
पहिल्याच दिवशी 60 कोटींहून अधिक कमाई केली असून, कमाईच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरातील चित्रपटाने 116 कोटी रुपये कमवून शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटाला देखील मागे टाकले आहे.
भारतातील सर्व भाषांमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 63.8 कोटी होते. पण, या सगळ्यात त्याच्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. हे उघड होण्याचे कारण म्हणजे सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे आणि तेही एचडी प्रिंटमध्ये. याचा परिणाम त्याच्या कमाईवर होण्याची शक्यता आहे.