गोविंदाने लॉन्च केला स्वत:चा ओटीटी अॅप; सबस्क्रिप्शनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Govinda OTT App| बॉलीवूड अभिनेता गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह तो राजकारणात देखील सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारात तो पाहायला मिळाला. यानंतर आता गोविंदाने स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव ‘फिल्मी लट्टू’ असे आहे. यासंदर्भात गोविंदाने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली.
गोविंदाने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने त्याच्या OTT प्लॅटफॉर्म ‘फिल्मी लट्टू’ बद्दल माहिती दिली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची पोस्ट शेअर करताना गोविंदाने कॅप्शनमध्ये लिहिले की,’माझे ओटीटी ॲप फिल्मी लट्टू सादर करत आहे. आत्ताच डाउनलोड करा आणि माझा ‘आ गया हीरो’ चित्रपट पहा. गोविंदाने आ गया हीरो या चित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे, गोविंदाच्या ओटीटी ॲप ‘फिल्मी लट्टू’चे पहिल्या वर्षाचे सबस्क्रिप्शन 149 रुपयांमध्ये असणार आहे.
View this post on Instagram
गोविंदच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्याने इलजाम या चित्रपटाद्वारे (1986) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इलजाम नंतर गोविंदाने लव्ह 86, हटिया, राजा बाबू, शोला और शबनम, कुली नंबर 1, हिरो नंबर 1, आंटी नंबर, दुल्हे राजा, भागम भाग, स्वर्ग, खुददार, आग, हम, यांसारखे अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट केले. परंतु मागील काही वर्षांपासून गोविंदा सिनेसृष्टीपासून दूर आहे. सध्या तो राजकारणात सक्रिय असल्याचे दिसते. Govinda OTT App|
हेही वाचा:





