Entertaiment : अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा हीची सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा रंगलेली असते. अनेकदा तिचे पार्टीदरम्यानचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावरून तिला ट्रोलही करण्यात आले होते. त्यानंतर आता अजय देवगणच्या मुलाची चर्चा रंगली आहे. न्यासाप्रमाणे युग देवगण हा फारसा लाईमलाईटमध्ये नसतो. अजय देवगणनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्याने एका चॅरिटेबल ट्रस्टच्या इव्हेंटला हजेरी लावली होती. अजयसोबत या कार्यक्रमाला युग देखील उपस्थित होता.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. येथील एक व्हिडिओ शेअर करत अजय देवगणने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये युग देवगणला पाहून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी युगला ‘लिटिल सिंघम’ आणि ‘नवा सिंघम’ असंही म्हटलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मध्यंतरी युगचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तेव्हाही युगची चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, अजय देवगणला या इंडस्ट्रीत 30 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्याचे आतापर्यंत अनेक चित्रपट गाजले आहेत. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या सिंघम या चित्रपटामुळे त्याची सिंघम म्हणून त्याची इंडस्ट्रीत ओळख आहे. आता लवकरच सिंघम रिटर्न्स हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगणसोबत रणवीर सिंग, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अक्षय कुमार देखील दिसणार आहेत.पुढच्या वर्षी 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज करण्यात येणार आहे.