करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण 8′ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक स्टार्सने आपल्या आणि इतर कलाकारांच्या पर्सनल लाईफबद्दल खुलासे केले. अशात आता राणी मुखर्जीही या चॅट शोचा भाग बनली आहे. या शो मध्ये राणीने तिच्या लाईफचे अपडेट मनमोकळेपणाने करण सोबत शेअर केले. राणीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. राणीने तिची लेक आदिराला लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचे कारणही सांगितले. माझ्या लेकीने सामान्य जीवन जगावे अशी तिची इच्छा आहे. असेही तिने सांगितले.
करण जोहरने राणी मुखर्जीला विचारले की ती आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर का ठेवते? यावर राणी म्हणाली की,’मी फक्त पापाराझींना माझ्या लेकीचे फोटो काढू नका असे सांगत असते. माझा असा विश्वास आहे की माझी लेक सर्व पापाराझीच्या डोळ्यात पाहते त्यावेळी ती कॅमेरा आणि त्यांना बघून घाबरते, आदिराच्या जन्मापासून मीडिया आणि पापाराझींनी फोटो न काढण्यासाठी माझे ऐकले आहे.’
राणी मुखर्जी पुढे म्हणाली की,’पापाराझी तिच्यावर खरोखर प्रेम करतात. आदिराने सामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगावे अशी माझी इच्छा आहे. शाळेतही आदिराला विशेष वाटू नये आणि ती सर्व मुलांसारखी शाळेत राहावी तिला सेलेब्रेटी फिलींग येऊ नये असा माझा प्रयत्न असतो. हे सर्व तेव्हाच शक्य होईल, जेव्हा माझा मुलीचे फोटो काढले जाणार नाहीत आणि आदिरा लाइमलाइटपासून दूर राहील.’ असा विश्वास राणीला आहे. माझ्या लेकीने सामान्य मुलीप्रमाणे जगावं असं माझं मत आहे. राणी मुखर्जीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, ती शेवटची ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात दिसली होती. यातील तिच्या अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले. ‘मर्दानी 2’ नंतर यातील राणीकच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती.सध्या ती ‘मर्दानी 3’ मध्ये काम करण्यास तयार आहे. त्याचे शूटिंग 2024 मध्ये सुरू होईल.