World Para Athletics Championships 2024 (Kobe, Japan ) :- भारताच्या सचिन सर्जेराव खिलारीने (Sachin Khilari) बुधवारी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात (गोळाफेक) आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत त्याने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.
सचिनने 16.30 मीटर अंतरापर्यंत लोखंडी चेंडू (गोळाफेक) फेकून त्याचा 16.21 मीटरचा आशियाई विक्रम मोडीत काढला, ज्याची त्याने गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नोंद केली होती.
स्पर्धेनंतर सचिन म्हणाला की, “मला येथे सुवर्णपदकाची अपेक्षा होती आणि मी आनंदी आहे. मी पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र झालो आहे आणि तिथेही मी सुवर्णपदक जिंकेन अशी आशा आहे.”
जपानमधील कोबे येथे सुरू असलेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत पाच सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह एकूण 12 पदके जिंकली आहेत.
Asian Relay Championships 2024 : भारतीय मिश्र रिले संघाचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णयश….
स्पर्धेचे आणखी तीन दिवस शिल्लक आहेत आणि भारताला सुवर्णासह आणखी काही पदके जिंकण्याची संधी आहे. मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण यांनी सांगितले की, “ते खूप आशावादी आहेत. आम्ही आणखी दोन सुवर्णपदकांची अपेक्षा करत आहोत आणि 17 पदकांचा आकडा गाठण्याची आम्हाला आशा आहे.”