कर्जत – कर्जत पोलिसांनी तालुक्यातील बारडगाव दगडी गावच्या शिवारात गावठी हातभट्टी तयार करण्याच्या अड्ड्यावर कारवाई करत दारू जप्त केली. दारू बनविण्यासाठी वापरत येत असलेले कच्चे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले . बारडगाव दगडी गावच्या शिवारात एक महिला गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन बनवत आहे, अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी कर्मचाऱ्यांसह जाऊन छापा टाकला. एक महिला घराच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन लाकडाच्या सहाय्याने ढवळत असताना दिसली.
पोलिसांनी पाच बॅरलमध्ये प्रत्येकी 200 लिटरप्रमाणे 1000 लिटर 50 रुपये दराने ५० हजारांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. ही कारवाई करत असताना बारडगाव दगडी ते पिंपळवाडी रस्त्याने स्विफ्ट कार (एमएच 12. एक्स 29 28) दिसली. अक्षय ताराचंद पवार हा या गाडीमधून दारूची वाहतूक करत असल्याचे समजल्याने पोलिसांनी ती गाडी थांबवली असता गाडीतील चालक अक्षय पवार हा गाडी सोडून पळून गेला. गाडीमध्ये देशी दारू संत्रा कंपनीच्या 32 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
बारडगाव दगडी गावचे शिवारात विठ्ठल किटल्या चव्हाण याच्याकडून २० हिजार किमतीचे कच्चे रसायन जप्त करण्यात आले. पोलिसांनी जागेवरच ते रसायन नष्ट केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस नाईक वाबळे , भांडवलकर, नरोटे, कोहक, ढवळे , कोल्हे, कांबळे यांनी केली.