जवळा – बंदिस्त व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी जवळा ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुजय विखे यांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी जवळा गावाचे उपसरपंच प्रशांत शिंदे, सरपंच सुशील आव्हाड, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन कोल्हे, प्रेम आव्हाड, पप्पू महारनवर, अनिल हजारे, शिखर मोहळकर, वैभव हजारे उपस्थित होते.
जवळा येथे बंदिस्त व्यायाम शाळा बांधकामासाठी निधी मिळावा, जवळा गावात पशुैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ मंजूर होवा, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेत वंचित राहिलेल्या वस्त्यांचा समावेश करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या कामांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार सुजय विखे यांनी दिले.