पाथर्डी – वंजारी महिला मंडळाच्या वतीने पाथर्डी शहरातील अतिथी मंगल कार्यालयात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुमारे सहाशे महिला भगिनींनी हळदी कुंकवाचा आनंद घेत.
मकर संक्रांतीचा सण साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, योगिता राजळे, माजी नगराध्यक्षा रंजना गर्जे, मनिषा घुले, सविता भापकर, मंगल कोकाटे, भालगावच्या माजी सरपंच डॉ.मनोरमा खेडकर, सरकारी वकील प्रज्ञा शिरसाट, कुसुम वारे, डॉ.शारदा गर्जे, डॉ.मनिषा देशमुख, डॉ.आरती जायभाय, डॉ.जयश्री आव्हाड, स्वाती दराडे आदी उपस्थित होत्या.
शहरातील माहेश्वरी महिला, विश्वकर्मा महिला, कासार समाज महिला, रामराज्य महिला, सुवर्णयुग महिला, संघर्ष महिला व सखी महिला मंडळ अशा अनेक संघटनांच्या सुमारे सहाशेंहून अधिक महिलांनी या मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा आनंद लुटला. आजच्या धावपळीच्या युगात कोणालाच वेळ देता येत नाही, मात्र या कार्यक्रमातून स्त्रिया भेटून आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या गप्पा मारत आनंद साजरा करतात. यातून मैत्री, सण, उत्सव आणि आपली संस्कृती, असा मेळ घडत असल्याचे मुख्य आयोजिका मनीषा घुले म्हणााल्या.
.