Agritourism | महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मुलूख कृषी पर्यटन केंद्र पुणे येथे 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.
भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अॅग्रो टुरिझम विश्व आयोजित कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना नव्याने रूजू पाहत आहे.
ग्रामीण व शहरी “संस्कृतीचे संगम” कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होत आहे. गावाला व शेतीला नवी ओळख करून देणारी संकल्पना म्हणून कृषी पर्यटन राज्यासह देशात विस्तारत आहे. या महत्वाच्या शेतीपूरक व्यवसायाची ओळख करून देणारी ही कार्यशाळा आम्ही तुमच्यासाठी आयोजित केले आहे. कृषी व पर्यटन संबंधीत अनुभवी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या कृषि पर्यटनात कृषी पर्यटनाची संकल्पना व व्याख्या, कृषी आणि ग्रामीण पर्यटन एकमेकांना पूरक, कृषी व ग्रामीण पर्यटनाची गरज व संधी, कृषी व ग्रामीण पर्यटनाची यशोगाथा, कृषी व ग्रामीण आधारित शेती, कृषी पर्यटनाचे व्याप्ती व विस्तार, पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन, कृषी पर्यटन व पर्यावरणाचे संबंध, शासकीय योजना व उपक्रम, कृषी पर्यटन धोरण 2020, कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक, कृषी व ग्रामीण पर्यटनाचे उद्धेश, पर्यटन कोण व कुठे सुरू करु शकतात, परवानग्या व कायदेशीर सल्ला, ग्रामीण व कृषी पर्यटनाचे भविष्य, मार्केटिंग व सोशल मिडिया यासह कृषि पर्यटनासंबंधी आदी माहिती दिली जाणार आहे.
याविषयी सुनील चांदोरे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, बसवंत विठाबाई बाबाराव पर्यटन व पर्यावरणाचे अभ्यास, कृषी अभ्यासक रितेश पोपळघट, पर्यटन अभ्यासक गणेश चप्पलवार, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक मा. संध्या आखाडे, मुलुख कृषी पर्यटन केंद्राचे कृषिराज पिलाणे आणि कर सल्लागार सी. ए अमोल वायभट मान्यवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी 9730023946 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.